Friday, June 10, 2016

फुरसत

  

अनिर्बंध स्वातंत्र्याच्या
एका प्रसन्न पहाटे
अंधूक प्रकाशात
 बहरलेला आणि
बहकलेला मोगरा …….
निवांत चांदणं  
नैसर्गिक हवेच्या
थंड झुळकेने सुखावून ………
तू तृप्त झालीस .
तुझी निशब्द
आश्वासक सोबत …….


साऱ्या जन्माची फुरसत 
एका क्षणांत सामावली होती.

नितिन उपाध्ये

No comments:

Post a Comment