ती असतेच
ती नाजूक
शेलाटी, सावळी
रोजच दिसते
ओळखीचे बघते
पण जराही
हासत नाही.....
मग ती अगम्य
गूढ , गहिरी तरीही
मैत्रीण रोजचीच जणू
बघते, ओळखते
पण जराही
बोलत नाही....
ती असते.
ती असतेच.....
अगदीच नेहमी
न ठरता
ठरल्या वेळेवरती
ती नसतानाही
असते माझी
बाकी माहीत नाही .......
नितिन
उपाध्ये
No comments:
Post a Comment